Marathi PREM Kavita

Love Poems

अल्बम आठवणींचा 

सहजच वळली पाऊले आपल्या त्या बागेकडे 
आणि आपल्या ग्रुप च्या त्या बाका कडे लक्ष गेले 

पुसट झालेलं सगळं काही उभं राहिलं डोळ्यापुढे 
आता स्पष्ट इतकं … जणू काल परवाच घडलेले

मी छेडले होते सूर कुणाचेतरी उसने गिटार घेउन 
तु वाजवायला सागिंतलेलीस तुझी आवडती धून

नंतर कॉलेजमध्ये, कॅन्टीन क्लासमध्ये 
पुन्हा पुन्हा घडल्या अनेक सहज भेटी गाठी

पण तू कधी नाही चाहूल लागू दिलीस 
तूच जुळवल होतंस सगळं फक्त माझ्यासाठी

तेव्हा तुझ्या मनाचे गुज कधीच नाही उमगले 
तुझ्या मनाचे गाणे केव्हा ऐकूच नाही आले

मी नेहमीच माझ्याच तंद्रीत सदा मन मौजी 
कधी सादच ऐकू नाही आली मला तुझ्या मनाची

मार्क्स , एक्झाम्स , कैंपस इण्ट रव्यू 
जॉब करीअर मी माझ्या तच दंग

तुझ्या भावना , तुझ्या कडेच राहिल्या 
नाही वाचता आले तुझ्या मनातले तरंग

वेगवान आयुष्याच्या प्रवाहावर होता स्वार 
क्षितीजच गाठले मी मानले स्वत: ला फारच "हुशार"

कधी अडखळत कधी धडपडत उंची तर गाठली
आता मात्र सोबतीच्या हाताची गरज वाटली

परवाच जुन्या पुस्तकात आपले ग्रु प फ़ोटो मिळाले 
पहिले तर प्रत्येक फोटोत तुझे डोळे माझ्याच वर खिळलेले

अलगद उलगडला मग जणू अल्बम प्रत्येक आठवणींचा 
आता कळतोय अर्थ तुझ्या प्रत्येक निशब्द: हाकेचा

उरले कुणी नाही बोलाया गुज सांगिन आता मनाचे मनाशी 
जुनीच स्वप्ने पुन्हा पाहीन नव्याने दिवा राहील जळत उशाशी

तू त्या एका एका रेशमी भेटी साठी शोधलेले किती तरी बहाणे 
आता रोजचेच झालेय अशा अनेक दिवा स्वप्नाचे येणे जाणे

सगळं सगळं आठवतंय पण आता आहेत सगळी च मृगजळे 
अंतरिच्या असह्य कोलाहलाने आता भरून येतात डोळे

गिटारहि विकत घेतलीय बघ रात्री बसेन हातात घेऊन 
बघुया आज तरी वाजवता येते का तुझी ती आवडती धून

• विनोदी • प्रेरणादायी • गंभीर  • इतर • चारोळ्या •