Marathi Kavita

Time Please

टाईम प्लीज

कधी तरी मध्यरात्री अर्धवट जागेपणीच वाटत
एक अख्खा दिवस जीवनावर प्रेम करावं

रंग उडालेल्या गोजिर्या रूपावर याच्या
द्या व्या काही रंगीत छटा नावीन्याच्या

मनमोकळ्या आभाळाखाली दूर लपत छ पत
बसून राहावं हसत एकमेकांशी गप्पा मारत

जगाच्या ताळमे ळी चीही पर्वा न करता निवांत
जगून घ्यावं आपल्याच तंद्रीत सूर्य अस्ताला जाईपर्यंत

पण अखेर वाजला परखड सत्याचा गजर
विसरू नको कर्तव्यांना , तुझ्या भावनांना आवर

माणूस आहेस तू नाही मोडू शकत चाकोरी
आलास या जन्मा इथे बंधने तोडण्याची चोरी

समाजा साठीचजगतो आपण आपला जन्म उभा
इथे नाही कोणाला स्वप्नं बघायची हि मुभा

अगदीच असह्य झालं तर शांत डोळे मिटुन नीज
पण जगत असताना नाही बोलू शकत "टाईम प्लीज "

• विनोदी • प्रेरणादायी • गंभीर  • इतर • चारोळ्या •