खरी भक्ती

Worshipping truely

खरी भक्ती


हर प्रहरी केली जाते निसर्गात अनेक सुगंधाची लयलुट
त्याच्या कर्त्याला ओवाळल्या जातात उदबत्या आणि धूप

आसमंतातल्या हजारो रंगाची उध ळण ज्या ला रोजचीच
तिथे आपण म्हणतो याला लाल जास्वंद त्याला माळ रुईचीच

सकाळ संध्याकाळ ज्याने निर्मिली अनेक रूपे वसुंधरे ची
त्याला खरच ओंजळ हवी आहे का पाना आणि फुलांची

ह्या मंडळाचा हा देव पावतो , तो स्वामी त्या देवाचा अवतार
आपणच आंधळे होतो आणि मग होतो देव भक्तीचा बाजार

अरे माणसा जागा हो ! तीन खंडात अष्टौ प्रहर राज्य असते ज्याचे
त्याच सृष्टी निर्मात्याला कसे दाखवतो आपण लालूच नवसाचे

आमच्या असतात हो मनात भाव बाकी सगळे करतात व्यवहार
मग त्याच भावनेने का नाही देत कुणा अनोळखी स मानसिक आधार

पुसा गरीबाच्या डोळ्यातले अश्रू , द्या एका वेळचे जेवण भुकेल्यास
जी होईल खरी भक्ती आणि मग आशीर्वाद देणे भाग पडेल त्या जग नियंत्यास

• विनोदी • प्रेरणादायी • गंभीर  • इतर • चारोळ्या •