करते आहे ती एका हाकेची प्रतीक्षा

Waiting for you

करते आहे ती एका हाकेची प्रतीक्षा

जन्माला येताच लागतो शिक्का
कपाळावर स्त्री पणाचा
सुरु होतो खेळ मुलगी बहिण
बायको आई ओझी बाळग ण्याचा

परक्याच धन म्हणुन सांभाळताना
उपरी स्वत: च्याच घरात
सामाजिक सोहळा करून बांधली
जाते दुसऱ्याच्या दारात

माया प्रेम ममत्व सर्व भावना तिने
काचेच्या अब्रू प्रमाणेच जपायच्या
राक्षसांच्या विखारी नजरा पुरुषीपणाच्या
नावा खाली चालवून घ्यायच्या

शिकार झालीच एखादी तर म्हणणार
तिचे च कपडे असतील वेडेवाकडे
बोका तोंड घालणारच ना कधी तरी
जर दिसले भांडे उघडे

स्त्री म्हणजे त्यागाचं प्रतिक , तिला
देवी सारखी पूजतो आमचा समाज
तिच्या स्वत्वाच पायपुसण झालं तरी
तिने करायचा नाही आवाज

संस्कृतीच्या नावा खाली पुसलं जात
निष्पाप बालिकेच मुक्त खिदळण
पिढ्यान पिढया वाढतच चाललंय
हैवाना च उन्मत्त खिंकाळण

अजून किती वर्षे द्याच्यची तुमच्या
मुलीला बहिणीला आईला ही शिक्षा
मान खाली घालून करते आहे ती
तुमच्या एका हाकेची प्रतीक्षा

• विनोदी • प्रेरणादायी • गंभीर  • इतर • चारोळ्या •