Inspirational Kavita,
Heal Your Life, Learn From Motivational Authors

माझ्या सोबत नव्या पृथ्वी वर येताय

Wisdom to inspire, educate and heal life

माझ्या सोबत नव्या पृथ्वी वर येताय

पाऊल अड्खळतय , काही तरी चेंज हवाय
माझ्या सोबत नव्या पृथ्वी वर येताय

त्याच मळलेल्या लाटा आणि निर्जीव किनारा
घाबरवणारा पाउस आणि रुसलेला वारा

अप्पलपोटी जंगले आणि स्वर्थिपणाचि दलदल
निष्पाप असहाय माणसांची केविलवाणी कलकल

माणू सकि ला झालाय बरा न होणारा आजार
शहाणे झालेत भूमिगत भरलाय मुर्खांचाच बाजार

बदलून टाकुया सगळे थोडा विचार करू या
भूतकाळ विसरून भविष्यात जाउया

उद्याच्या पिढीला देवून जाऊ विचारांचा ठेवा
त्यासाठी स्वत: च्या कर्तुत्वा वर विश्वास हवा

चला तुम्हीही पावले उचलताय
माझ्या सोबत नव्या पृथ्वी वर येताय

• विनोदी • प्रेरणादायी • गंभीर  • इतर • चारोळ्या •