Marathi Vinodi Kavita

गाडी पाणी पुरीची

गाडी पाणी पुरीची

रस्त्याच्या कडेला, कोपऱ्या वरची
खुणा वते नेहमीच गाडी पाणी पुरीची

कोणी म्हणे पाणी के पताशे कोणी गुपचूप
कुठे पुचके … गोलगप्पा नावे आहेत खूप

कधी मुगाची कधी बटाट्याची
कधी वाटाण्याची कधी रगड्याचि

आंबट गोड चव न्यारी तिखट भुरका
डोळ्यातून धारा आणि जोरदार ठसका

राजा असो वा रंक सर्व एकाच ओळीत
पाणीपुरीची चव असतेच अशी चटपटीत

• विनोदी • प्रेरणादायी • गंभीर  • इतर • चारोळ्या •