Yellowstone National Park

महा- ज्वालामुखीच्या प्रदेशात फ़ुलले जीवन

महा- ज्वालामुखीच्या प्रदेशात फ़ुलले जीवन

महा- ज्वालामुखीच्या प्रदेशात फ़ुलले जीवन : येलो स्टोन नॅशनल पार्क
(टिपः- हा लेख ७जुलै २०१७ च्या लोकप्रभा अन्कात प्रसिद्ध झाला आहे.)

Humor, Laugh, Relaxation

लेखाचे नाव वाचून दचकायला झाला का? पण मी बरोबर लिहिलंय हं ! खरोखरीच. सध्या उद्रेक होत नाही-पण जागृत आहे -अश्या एका महाज्वालामुखीच्या प्रदेशात तीन दिवस फिरून आलेय. अक्षरशः -कल्पनातीत सुंदर, भव्य , त्याचबरोबर आपल्याला खुजेपणाची जाणीव करून देणारे निसर्गाचे वेगवेगळे अविष्कार तिथे पाहायला मिळाले.
त्याचं असं झालं… अमेरिकेत लेकीकडे थोडे दिवस गेले होते, तेव्हा लेक-जावयानी आग्रह केला की सलग ४ दिवस सुट्टी मिळतेय तर कुठे तरी जाऊया. कुठे कुठे जाऊ शकतो, तिथे बघण्यासारखं काय आहे, एव्हड्या उशीरा ठरतंय तर आता तिकिटं कशी मिळणार, राहण्यासाठी बुकिंग आता शिल्लक नाहीय .. अशा सर्व प्रशनांचा सर्वांकडून किस पाडला गेला. आणि, हो -नाही करता करता शेवटी लेकीने फर्मानच काढले. आपण ‘येलो स्टोन नॅशनल पार्क ला’ जाणार आहोत. तुम्ही पाहण्यासारखंच आहे- नव्हे -पाहायलाच हवं हे ठिकाण. ती एकदा जाऊन आलेली असल्याने आम्हाला हो म्हणण्याशिवाय पर्यायच नव्हता!
पुढचे दोन दिवस नेहमीचं व्यस्त जीवन सांभाळत दोघेही गूगल मध्ये मान खुपसून पुढचा प्लॅन ठरवायला बसली. महाग झाली असली तरी विमानाची पटापट तिकिटे काढून झाली. पुढच्या प्रवासासाठी लागणाऱ्या कारचं बुकिंग करून झालं. अजून महत्वाचा प्रश्न रेंगाळलाच होता. राहायचं कुठं? कारण येलो स्टोन च्या कुठल्याच लॉज मध्ये आता जागा शिल्लक नव्हती. एखाद-दुसऱ्या लॉज मध्ये जागा होती. पण आता दर भरमसाठ लावले गेले होते. अश्या वेळी मुख्य ठिकाणापासून थोड्या अंतरावर आसपासची जागा बघायची आमची नेहमीची क्लृप्ती माञ कामाला आली! ‘येलो स्टोन नॅशनल पार्क’ पासून, कारने तासाभराच्या अंतरावर असणाऱ्या एका ठिकाणी लाकडाच्या ओंडक्यांनी बनवलेल्या आणि ‘ऐतिहासिक’ असे वर्णन केलेल्या जुन्या पध्दतीच्या ‘ऍन केंट केबिन’ चा आम्हाला शोध लागला. फूट फूट व्यास असणाऱ्या मोठमोठ्या लाकडाचे ओंडके आडवे एकावर एक रचून ‘ऍन केंट केबिन’ च्या भिंती, आणि हेच लांबलचक ओंडके उभे एकाला एक जोडून पार्टीशन केले होते. सभोवती ‘ग्रँड टेटोन नॅशनल पार्क’ असल्याने ‘एव्हडं लांब जातोय, तर तेवढाच आणखी एका पार्कचा लाभ आणखी पदरात पडून घेता येईल’ असा सुज्ञ, मध्यमवर्गीय विचार करून ती ओंडक्यांची ‘हिस्टोरिकल झोपडी’ आम्ही पक्की करून टाकली.
अर्थात तो अत्यंत शहाणपणाचा निर्णय होता हे आम्हाला तिथे गेल्यावर कळलं! कारण, जागेच्या वर्णनात दिल्याप्रमाणे, हिरव्यागार हिरवळीवरची ही छोटीशी, दोन-दोन खोल्यांची आणि जमिनीपासून छतापर्यंत पूर्ण लाकडाची असलेली तीन निवासस्थाने शंभर वर्षांपूर्वीची, आणि खेड्याकडच्या पद्धतीची साधी होती. त्यामुळे, त्या काळच्या लोकांची राहणीमानाची झलक आपण अनुभवत आहोत ही कल्पना भारीच रोमांचकारी वाटत होती. अर्थात स्वयंपाकघर आणि बाथरूम मध्ये माइक्रोवेव्ह, फ्रीझ, बाथ टब, वॉशिंग मशीन वगैरे गरजेच्या गोष्टीं वापरून आधुनिकीकरणही केले होते. फूट फूट व्यास असणाऱ्या मोठमोठ्या लाकडाचे ओंडके आडवे एकावर एक रचून ‘ऍन केंट केबिन’च्या भिंती, आणि हेच लांबलचक ओंडके उभे एकाला एक जोडून पार्टीशन केले होते. आतल्या खोलीतला डबल बेड सुद्धा असाच भल्या मोठ्या गाठी गाठी असणाऱ्या ओंडक्यांचा आणि बराच उंच होता. त्याच्यावर गाद्या, रजया रचल्याने तो आणखीनच उंच झाला होता.

Humor, Laugh, Relaxation

दूरवर नजर बांधून ठेवणारा ‘ग्रँड टेटोन’ पर्वत दृष्टीस पडत होता. निळा-जांभळा टेटोन पर्वत, आणि मधे - मधे त्याची बर्फामुळे पांढरी- चमकदार दिसणारी टोकदार शिखरे हे सगळं दर्शन केवळ अप्रतिम! ‘येलो स्टोन’ हा ज्वालामुखी आहे दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे (म्ह्नणजे ५ वाजता! ) उठून आवरून ‘येलो स्टोन पार्क’ ची वाट धरली. १८७२ साली निर्माण झालेले हे पार्क अमेरिकेतलं (आणि कदाचित जगातलंही) सगळ्यात पहिलं पार्क आहे. जागतिक वारसा-स्थळ म्हणून मान्यता असलेलं येलोस्टोन पार्क म्हणजे एक सध्या उद्रेक होत नसलेला पण ‘सक्रीय’ असलेला महा -ज्वालामुखी आहे. अमेरिकेच्या वयोमिंग राज्याच्या वायव्य भागात याचा ९६ टक्के भाग येतो, तसंच ते मोन्टाना आणि आयडाहो या दोन राज्यांच्या काही भागातही पसरलं आहे. अर्थात पार्कची निर्मिती झाली तेव्हा ही वेगवेगळी राज्ये म्हणून अस्तित्वात देखील नव्हती. या पार्कचं नाव त्या प्रदेशातून वाहणाऱ्या ‘येलो-स्टोन‘ नदीच्या नावावरून पडलं आहे. लाव्हा थंड झाल्यानंतर तयार झालेल्या खडकांच्या थरातून वाहताना खडक झिजून खूप खोल घळई तयार होत गेली. आता तर १२०० फूट खोल आणि ४००० फूट रुंद, ४० किलोमीटर लांब अशा महा-घळई मधून नदी वाहते आहे. आणि तिच्या दोन्ही बाजूना लालसर, गुलाबी, जांभळट, नारिंगी अश्या विविध छटा असणाऱ्या पण मुख्यत्वे करून पिवळ्या रंग असणाऱ्या खडकांचा डोंगराळ भाग दिसतो. अच्छा! म्हणून तिचं नाव ‘येलो - स्टोन’ तर.

- Submitted by दीपा जोशी

Yellowstone National Park is a nearly 3,500-sq.-mile wilderness recreation area atop a volcanic hot spot. Mostly in Wyoming, the park spreads into parts of Montana and Idaho too. Yellowstone features dramatic canyons, alpine rivers, lush forests, hot springs and gushing geysers, including its most famous, Old Faithful geysers

• विनोदी • प्रेरणादायी • गंभीर  • इतर • चारोळ्या •